कोल्हापुरात आढळला अनोळखा मृतदेह...
कोल्हापूर - कोल्हापुरातील कसबा बावडाजवळील पंचगंगा घाटालगत एक पुरुष जातीचा अनोळखा मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
पंचगंगा घाटा नजीक असणाऱ्या दत्त मंदिरात पूजेसाठी आलेल्या पुजाऱ्यांना एक माणूस झोपल्याचं दिसून आले. त्या माणसाला पुजाऱ्यांनी उठवण्याचा प्रयत्न केला. परंतु तो माणूस उठत नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी हा सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. सध्या हा अनोळखा मृतदेह सीपीआरमध्ये आणण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.