अटकेचं वॉरंट निघताच...दवाखान्याचा सिलसिला सुरु...

<p>अटकेचं वॉरंट निघताच...दवाखान्याचा सिलसिला सुरु...</p>

मुंबई – नाशिक न्यायालयाने अजित पवार गटाचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या अटकेचा वॉरंट काढल्यानंतर नाशिक पोलीस आ. कोकाटेंना अटक करण्यासाठी मुंबईमध्ये  दाखल झाले आहेत. तेव्हापासून आ. कोकाटे यांनी दवाखान्याचं कारण समोर केले आहे.
काल त्यांनी आपल्या मंत्री पदाचा राजीनामा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द केल्या नंतर  राज्यपालांनी  त्यांचा राजीनामा मंजूर केला आहे.  उच्च रक्तदाबाचा त्रास वाढल्याने सध्या मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल असलेल्या कोकाटे यांच्यावर अँजिओग्राफी केली जाणार आहे. डॉक्टरांच्या प्राथमिक अहवालानुसार, कोकाटे यांना सध्या पूर्ण विश्रांतीची आवश्यकता असून, कोणताही ताण येऊ नये यासाठी विशेष काळजी घेण्यात येत आहे.