सीपीआरच्या वाहतूक मार्गात उद्यापासून बदल...

<p>सीपीआरच्या वाहतूक मार्गात उद्यापासून बदल...</p>

कोल्हापूर –  सध्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि  छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयामध्ये विविध इमारतीचे दुरुस्ती आणि  नुतनीकरणाचे काम सुरु आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेत अडचणी निर्माण होत असून वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे  उद्या  शनिवारपासून गोदावरी इमारतीजवळील प्रवेशद्वारातून दुचाकी व चारचाकी वाहनांना प्रवेश दिला जाणार आहे तर  शाहू स्मारकाकडील असलेल्या कुंभी इमारतीच्या प्रवेशद्वारातून वाहनांना बाहेर जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी  माहिती अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे यांनी दिली आहे.