धक्कादायक : हुपरीत मुलाकडून आई - वडिलांची हत्या...
कोल्हापूर - हातकणंगले तालुक्यातील हुपरी शहरातील मुलाने आपल्या आई - वडिलांची निर्घृण हत्या केली आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आज पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास हुपरीतील इंग्रोळे कॉर्नरजवळ ही घटना घडली आहे. विजयमाला नारायण भोसले (वय वर्षे 70) असे आईचे नाव असून नारायण गणपतराव भोसले (वय वर्षे 78) असे वडिलांचे नाव आहे.
घराची वाटणी करून देण्यावरून ही हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. काचा,विळती, दगड आणि काठीने डोक्यात मारून तसेच हातांची नस कापून ही निर्घृण हत्या करण्यात आली आहे. हत्या केल्यानंतर मुलगा स्वतःहून हुपरी पोलीस ठाण्यात हजर झाला आहे.