मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे...

<p>मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे...</p>

मुंबई – नाशिक न्यायालयाच्या निर्देशानुसार मंत्री माणिकराव कोकाटे यांना अटक करण्यासाठी नाशिक पोलीस मुंबईमध्ये दाखल झाले आहे. असे असताना तब्येतीचे कारण पुढे करून ते ही अटक टाळण्याचा प्रयत्न करत आहेत. हे एकीकडे सुरु असताना मंत्री माणिकराव कोकाटे यांचा मंत्री पदाचा राजीनामा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वीकारला आहे.

राजीनाम्याचे पत्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवला आहे. अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून दिली आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा स्वीकारल्यानंतर माणिकराव कोकाटे यांचे  मंत्रिपद अधिकृतपणे जाणार आहे.