कोल्हापूर महानगरपालिकेसाठी इच्छुक उमेदवारांना आपकडून अर्ज वाटप
कोल्हापूर - कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीची घोषणा होताच आम आदमी पार्टी सक्रिय झाली आहे. आपकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक उमेदवारांसाठी आजपासून अर्ज वाटप सुरू करण्यात आले आहे. उद्यापर्यंत अर्ज वाटपाची प्रक्रिया चालणार असून २० आणि २१ डिसेंबर रोजी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहे, अशी माहिती शहराध्यक्ष उत्तम पाटील यांनी दिली. दरम्यान इच्छुकांनी आप कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष संदीप देसाई यांनी केले आहे.
आज पहिल्या दिवशी समीर लतिफ, विजय हेगडे, श्रेया हेगडे, अभिजित कांबळे, मयूर भोसले, स्वप्नील काळे, अनिल जाधव या इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे.