स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पीपल्स रिपब्लिकन पार्टीची शिंदेसेनेसोबत युती...
कोल्हापूर - राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पीपल्स रिपब्लिकन पार्टीची महायुतीतल्या शिवसेना शिंदे गटाबरोबर युती असणार आहे. महायुतीमधील घटक पक्ष म्हणून पार्टीने कोल्हापूर महापालिकेसाठी चार आणि इचलकरंजीसाठी तीन जागांची मागणी केली, अशी माहिती पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष डॉक्टर नंदकुमार गोंधळी यांनी दिली आहे.
कोल्हापूर जिल्हा परिषदेसाठी १० आणि पंचायत समितीसाठी १५ जागांची मागणी करण्यात आली आहे. महायुतीतील वरिष्ठ नेत्यांशी आपली चर्चा सुरू असून आपल्याला योग्य जागा मिळतील, असा विश्वास गोंधळी यांनी व्यक्त केला आहे. पत्रकार बैठकीला जिल्हाध्यक्ष अशोक कांबळे, सरचिटणीस विद्याधर कांबळे, सोमनाथ घोडेराव , लता नागावकर, माधुरी कांबळे, सुरेश सावर्डेकर, भरत सोरटे, विद्या रेंदाळकर उपस्थित होत्या.