‘पीआरएसआय’चे कोल्हापूर चॅप्टर व कार्यकारिणी जाहीर

पश्चिम महाराष्ट्रातील माध्यम क्षेत्राचे क्षितिज विस्तारणार

<p>‘पीआरएसआय’चे कोल्हापूर चॅप्टर व कार्यकारिणी जाहीर</p>

कोल्हापूर  : देशातील जनसंपर्क क्षेत्रातील अग्रगण्य संस्था असलेल्या पब्लिक रिलेशन सोसायटी ऑफ इंडिया (पीआरएसआय) च्या कोल्हापूर चॅप्टरची स्थापना व नवीन कार्यकारिणीची घोषणा राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अजीत पाठक यांनी नुकतीच केली.

नवीन कार्यकारिणीत अध्यक्षपदी शिवाजी विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाच्या विभागप्रमुख व ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. निशा मुडे-पवार, उपाध्यक्षपदी ‘नँक’चे सल्लागार डॉ. जगन्नाथ पाटील, तर सचिवपदी महावितरणचे जनसंपर्क अधिकारी विश्वजीत भोसले यांची निवड करण्यात आली आहे. सहसचिवपदी डॉ. अनुराधा इनामदार तर कोषाध्यक्षपदी तुतारी जाहिरात संस्थेचे प्रमुख सचिन मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

कार्यकारिणी सदस्य म्हणून वारणा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रताप पाटील, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, ज्येष्ठ पत्रकार दशरथ पारेखर, ज्येष्ठ पत्रकार व दैनिक पुढारीचे निवासी संपादक राजेंद्रकुमार चौगुले, सोलापूर विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातील प्राध्यापक डॉ. अंबादास भास्के तसेच कणेरी मठ, कोल्हापूरचे विवेक सिद्ध यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

कोल्हापूर चॅप्टरच्या सल्लागार समितीत महावितरणचे सेवानिवृत्त मुख्य जनसंपर्क अधिकारी पी. एस. पाटील, मुख्यमंत्री कार्यालयाचे वरिष्ठ सहायक संचालक रवींद्र राऊत, रत्नागिरी जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते आणि डॉ. शैलेंद्र सडोलीकर यांचा समावेश आहे.

विद्यार्थी नोंदणी समितीत अहमदनगर कॉलेजचे प्रा. डॉ. बापू चंदनशिवे, शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण विभागातील डॉ. नितीन रणदिवे, पुणे विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातील डॉ. वृषाली बर्गे आणि सोलापूर विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातील डॉ. तेजस्विनी कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रसिद्धी समितीत संवादतज्ज्ञ चंद्रकांत कबाडे, लोकमतचे पत्रकार डॉ. शेखर वानखेडे, कृष्णा हॉस्पिटल, कराडचे जनसंपर्क अधिकारी सुशील लाड आणि विवेक पोर्लेकर यांचा समावेश आहे.

➡️१९६६ पासून देशपातळीवर कार्यरत संस्था- 
जनसंपर्क क्षेत्राचा विकास, जनसंपर्क मूल्यांची जोपासना, अनुभव व ज्ञानाचे आदान–प्रदान, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, उत्कृष्ट कामाचा गौरव, संशोधनास प्रोत्साहन तसेच जनसंपर्काशी संबंधित साहित्य प्रकाशन अशा विविध उपक्रमांद्वारे पीआरएसआय संस्था १९६६ पासून देशपातळीवर कार्यरत आहे.

➡️पश्चिम महाराष्ट्रातील माध्यम क्षेत्राला नवे व्यासपीठ-
पीआरएसआय ही माध्यम क्षेत्राशी संबंधित ना-नफा ना-तोटा तत्वावर चालणारी व्यावसायिक संघटना आहे. या संस्थेमुळे जनसंपर्क व्यावसायिक, माध्यम क्षेत्रातील प्राध्यापक, पत्रकार तसेच या क्षेत्रात प्रवेश करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. देशभरातील तज्ज्ञांचे ज्ञान व अनुभव स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार असून याचा सर्वाधिक फायदा पत्रकारिता व जनसंपर्क क्षेत्रातील विद्यार्थ्यांना होईल, असे मत सचिव विश्वजीत भोसले यांनी व्यक्त केले.

या कार्यालयांत संबंधित प्रभागांतील उमेदवारांचे नामनिर्देशन स्वीकारणे, नामनिर्देशन पत्रांची छाननी, निवडणूक साहित्य वाटप तसेच मतदानानंतर मतदान यंत्रे जमा करून घेण्याची कार्यवाही केली जाणार आहे. प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी कसबा बावडा पॅव्हेलियन हॉल, छत्रपती शिवाजी मार्केट येथील विभागीय कार्यालय, दुधाळी पॅव्हेलियन हॉल तसेच राजोपाध्ये नगर येथील कार्यालयांची पाहणी करून निवडणूक कामकाजासाठी आवश्यक सर्व सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्याच्या सूचना शहर अभियंता रमेश मस्कर यांना दिल्या.