सत्तर वर्षाचे आजोबा छतावरून पडले अन् त्यांना काळानं गाठलं...
कोल्हापूर - ७० वर्षाचे अशोक चारू पाटील हे दुकानाच्या पत्र्याच्या शेडवरून खाली पडल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे गावातून हळहळ व्यक्त होत आहे.
हातकणंगले तालुक्यातील हालोंडी या गावातील अशोक चारू पाटील हे आपल्या मार्बल दुकानाच्या छतावरील कचरा साफ करण्यासाठी चढले होते यावेळी त्यांचा तोल गेल्याने ते जमिनीवर पडले. यावेळी त्यांना दुखापत झाल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु त्यांचा यात मृत्यू झाला आहे. त्यांच्या अचानक जाण्याने हालोंडी गावात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सुन, नातवंडे असा परिवार आहे.