कोणत्याही क्षणी मंत्री माणिकराव कोकाटेंना पोलीस घेणार ताब्यात... अटक वॉरंट जारी
नाशिक - नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने मंत्री माणिकराव कोकाटे यांची शिक्षा कायम ठेवून कोकाटे बंधूंना अटकेचे वॉरंट जारी केले आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी त्यांना अटक होवू शकते.
न्यायालयाने अटकेचे निर्देश दिल्यामुळे माणिकराव कोकाटे यांचे क्रीडामंत्री पद कोणाकडे द्यायचं यावर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.