काँग्रेस कमिटीमध्ये दुसऱ्या दिवशीही इच्छुकांचा ओघ कायम
कोल्हापूर - काँग्रेस कमिटीच्या वतीने घेण्यात येणाऱ्या मुलाखतींच्या दुसऱ्या दिवशीही इच्छुकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. आज सकाळी ८.३० वाजल्यापासूनच इच्छुक उमेदवारांनी मुलाखतींसाठी काँग्रेस कमिटीमध्ये उपस्थिती लावण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी दहा प्रभागातील उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. आज उर्वरित दहा प्रभागासाठी सकाळपासून मुलाखती सुरू आहेत. त्यामुळे काँग्रेस कमिटी परिसर गर्दीने फुलून गेलाय.
विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत कमिटीच्या सदस्यांकडून नियोजित वेळापत्रकानुसार मुलाखती घेण्यात येत असून, प्रक्रियेदरम्यान शिस्तबद्ध व्यवस्था ठेवण्यात आली आहे. दुसऱ्या दिवशीही मोठ्या संख्येने इच्छुक उपस्थित राहिल्याने काँग्रेस पक्षातील राजकीय हालचालींना वेग आल्याचे चित्र आहे.