राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कामगारांची प्रलंबित देयके कधी अदा करणार ? : आ. सतेज पाटील यांचा सवाल
कोल्हापूर - आमदार सतेज पाटील यांनी राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कामगारांच्या प्रलंबित देयकांबाबतचा प्रश्न विधानपरिषदेत उपस्थित केला.
कामगारांचे सन २०१८ पासून महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वार्षिक वेतनवाढ आणि वेतनवाढीच्या फरकाची सुमारे ४४०० ते ४५०० कोटी रूपयांची रक्कम प्रलंबित आहे. या कामगारांची रक्कम न देता राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बँकेची रक्कम तसेच कंत्राटदारांची देयकं लेखा खात्याकडून नियमितपणे अदा करण्यात येत आहेत. या बाबीला जबाबदार असलेल्या लेखा खात्यातील संबंधित अधिकाऱ्यांवर शासनाने काय कारवाई केली ?
महामंडळाच्या कामगारांचे प्रश्न तातडीने सोडविण्याबाबत आणि त्यांची प्रलंबित रक्कम अदा करण्याबाबत कोणती कार्यवाही केली ?, विलंबाची कारणं काय आहेत ? असे प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केला. यावर उत्तर देताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी, कर्मचाऱ्यांची प्रलंबित देयकं निधीच्या उपलब्धतेनुसार अदा करण्याची कार्यवाही चालु असल्याची माहिती दिली. तसेच निधीच्या कमतरतेमुळे कामगारांच्या देयकांना विलंब झाल्याची कबुलीही त्यांनी दिली.