कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून इच्छुकांच्या मुलाखती...

<p>कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून इच्छुकांच्या मुलाखती...</p>

कोल्हापूर - महापालिका निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्षातील हालचाली वाढल्या आहेत. आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आयोजित केल्या होत्या. कोल्हापूर महापालिकेच्या ८१ प्रभागांसाठी ३५ जणांनी उपस्थिती लावून मुलाखती दिल्या.

 यामध्ये शहर प्रमुख सुनील मोदी, राजू जाधव, शशिकांत बिडकर, नियाज खान, सागर साळोखे, राहुल माळी, विशाल देवकुळे, अनिल पाटील, स्मिता सावंत, अनिता ठोंबरे, कोमल लोंढे, किशोरी कोळेकर यांचा समावेश होता. संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर , सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले, निरीक्षक रघुनाथ खडके, महिला आघाडी प्रमुख प्रतिज्ञा उत्तुरे आणि रीमा देशपांडे यांच्या उपस्थितीत या मुलाखती झाल्या.

यावेळी संपर्कप्रमुख दुधवडकर यांनी, कोल्हापूर महापालिकेची निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढणार असल्याचे सांगितले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्यासह इतर महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षाच्या स्थानिक नेते मंडळींशी तसेच मनसेच्या जिल्हा अध्यक्षांशी चर्चा करून उमेदवारीबाबत निर्णय घेणार असल्याचे दुधवडकर यांनी सांगितले.

निवडणूक येण्याची क्षमता असलेल्या आणि निष्ठावंत शिवसैनिकांना संधी देवून महापालिका निवडणुकीत विजय मिळवणार असल्याचा विश्वास दुधवडकर यांनी व्यक्त केलाय.