इचलकरंजी महापालिका निवडणूक महायुती म्हणूनच लढवणार... बैठकीत निर्णय

<p>इचलकरंजी महापालिका निवडणूक महायुती म्हणूनच लढवणार... बैठकीत निर्णय</p>

कोल्हापूर -  राज्यातील महापालिका निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्षाच्या हालचालींना वेग आलाय. या निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर इचलकरंजीत आमदार राहूल आवाडे, शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख रविंद्र माने, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अमित गाताडे यांची बैठक झाली. सुमारे एक तास त्यांच्यात चर्चा झाली.

या बैठकीत आगामी महापालिका निवडणूक महायुती म्हणूनच लढवण्याचा निर्णय झाला. यावेळी महायुतीचाच महापौर होणार असल्याचा विश्वास महायुतीच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे.