काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी अन् राहुल गांधी यांना कोर्टाचा मोठा दिलासा 

<p>काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी अन् राहुल गांधी यांना कोर्टाचा मोठा दिलासा </p>

नवी दिल्ली - काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी आणि विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी दिल्ली कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे.
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी संबंधित सोनिया गांधी, राहुल गांधी आणि इतर पाच जणांविरुद्धच्या अंमलबजावणी संचालनालयाच्या मनी लाँड्रिंग प्रकरणाची दखल घेण्यास दिल्ली कोर्टाने नकार दिला आहे. 
एफआयआर दाखल नसताना, अंमलबजावणी संचालनालयाने मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत दाखल केलेली तक्रार कोर्टात टिकण्यायोग्य नाही कारण हे प्रकरण एका खासगी तक्रारीवर आधारित आहे. भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी दाखल केलेल्या तक्रारीवर हे प्रकरण असून, एफआयआर दाखल झालेला नाही, असे न्यायालयाने नमूद केले आहे.