काही सेकंदात ब्राझीलचा ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’ कोसळला...व्हिडीओ व्हायरल
नवी दिल्ली - ब्राझीलमधील स्टॅच्यू ऑफ लिबर्टी काही सेंकदात कोसळल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
ब्राझीलच्या रिओ ग्रांडे दो राज्यातील ग्वायबा शहरात वादळी वाऱ्यामुळे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी काही सेकंदात कोसळला आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दक्षिण ब्राझीलमधील शक्तिशाली वादळामुळे हवन मेगास्टोअरच्या बाहेर स्टॅच्यू ऑफ लिबर्टीची २४ मीटर उंचीची प्रतिकृती उभारली होती. तिला धक्का बसल्याचे समोर येत आहे.