आज,  उद्या काँग्रेसकडून इच्छुकांच्या मुलाखती...

<p>आज,  उद्या काँग्रेसकडून इच्छुकांच्या मुलाखती...</p>

कोल्हापूर  - काल निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकीची तारीख जाहीर केल्यामुळे आजपासून काँग्रेसने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केली आहे.

त्यानुसार आज मंगळवार व बुधवारी विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार ऋतुराज पाटील, शहराध्यक्ष सचिन चव्हाण, राजेश लाटकर, आनंद माने, विक्रम जरग, तौफीक मुल्लाणी, भारती पोवार, भरत रसाळे यांच्या उपस्थितीत कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटी येथे मुलाखती घेण्यात येणार आहेत.

 प्रभाग क्रमांक १ ते १० मधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आज मंगळवारी दुपारी १ ते सायंकाळी ५ :३० वाजेपर्यंत घेण्यात येतील तर प्रभाग क्रमांक ११ ते २० मधील इच्छुकांच्या मुलाखती उद्या बुधवारी सकाळी ९ ते दुपारी १ :३० वाजेपर्यंत घेण्यात येतील. महापालिका निवडणुकीच्या मैदानात उतरण्यासाठी काँग्रेसकडे २३० हून अधिक जणांनी उमेदवारीची मागणी केली आहे. एका एका प्रभागात डझनभरहून अधिक इच्छुक असल्याने उमेदवारी देताना नेत्यांचा कस लागणार आहे. त्यामुळे उमेदवाराचे प्रभागातील काम, जनसंपर्क व पक्षाशी निष्ठा यावरून  उमेदवारांना संधी दिली जाणार आहे.