उद्या महापालिकेच्या दरवाज्यावर कृती समितीच्यावतीने शंखनाद आंदोलन...

<p>उद्या महापालिकेच्या दरवाज्यावर कृती समितीच्यावतीने शंखनाद आंदोलन...</p>

कोल्हापूर -  गेली ५ वर्षे कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक झाली नाही. त्यामुळे सर्व कारभार प्रशासक आणि त्यांनी नेमलेल्या समितीच्या हातामध्ये सर्वस्वी गेला. एकीकडे कोल्हापूर शहराच्या विकासाच्या वल्गना करत असताना, हद्दवाढ होण्यासाठी स्वतःहून कोणताही ठोस प्रयत्न केला नाही. त्यामुळे शहर व रहिवासी यांच्या प्रगतीस खिळ बसली आहे. त्यामुळे उद्या मंगळवारी सकाळी ११.३० वाजता कोल्हापूर महानगरपालिकेच्या दरवाज्यासमोर शंखनाद आंदोलन करण्यात येणार असल्याचे कोल्हापूर शहर व जिल्हा सर्वपक्षीय कृती समितीने पत्रकाद्वारे कळवले आहे.