आजपासून आचारसंहिता लागू..!   

राज्यातील २९ महापालिकांचे बिगुल वाजलं...

<p>आजपासून आचारसंहिता लागू..!   </p>

मुंबई – राज्यातील  २९ महापालिकांच्या  निवडणुकींसाठी आजपासून आचारसंहिता लागू झाल्याचं निवडणूक आयुक्तांनी जाहीर केले आहे. त्यानुसार त्यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.

राज्यातील २९ महापालिकांपैकी २७ महापालिकांची मुदत संपली आहे. 
त्यानुसार राज्यातील महापालिका निवडणुकीसाठी २९ हजार मतदान केंद्र उभारली जाणार आहेत. या सर्व निवडणूक प्रक्रियेसाठी २९० निवडणूक अधिकाऱ्यांची तर ३९ हजार कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यानुसार २३ ते ३० डिसेंबरपर्यंत उमेदवारांना अर्ज भरता येणार आहे. ३१ डिसेंबरला छाननी होणार आहे. त्यानंतर  १५ जानेवारी २०२६ रोजी मतदानाचा हक्क बजावता येणार असून १६ जानेवारीला निकाल जाहीर केला जाणार आहे.