‘त्यांचं काय करायचं..?’ : अधिकाऱ्यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा इशारा
नागपूर – ‘जनतेला शिक्षा होते, पण जे अधिकारी नियमानुसार वेळेत काम करत नाहीत, त्यांचं काय करायचं?’ असं केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी म्हणत, माझ्या राजकीय आयुष्यात माझ्याकडून आता चांगले रस्ते झाले आहेत, आता मी किती अधिकाऱ्यांना जेलमध्ये टाकतो, कितींना सस्पेंड करतो याचं रेकॉर्ड माझ्या हातून झालं पाहिजे आणि यासाठी मी देशात हात धुवून मागे लागलो आहे", असा इशारा त्यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे.
आपण जनतेशी प्रामाणिक राहिलं पाहिजे, गोड-गोड बोलतात म्हणून कोणाचं ऐकायचं काही कारण नाही, जनता हीच मालक आहे, ह्यांची कामे झाली पाहिजे.जी व्यवस्था न्याय देत नाही, ती उखडून टाकली पाहिजे, असे परखड भाष्य नितीन गडकरी यांनी केले आहे.