आज आरोग्य उपसंचालकांकडून शल्य चिकित्सक कार्यालयातील रजिस्टरची तपासणी...
कोल्हापूर – काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शल्य चिकित्सक कार्यालयाला भेट दिली. यावेळी स्टिंग ऑपरेशन राबवत कार्यकर्त्यांनी रजिस्टरची तपासणी केली. त्यावेळी वैद्यकीय बिलांच्या मंजुरीचा आर्थिक देव-घेवचा व्यवहार समोर आला होता. यानंतर आरोग्य मंत्रालयाच्या सूचनेनुसार या प्रकरणाच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली होती.
या सर्व घडामोडीनंतर आज आरोग्य उपसंचालक डॉक्टर दिलीप माने,सहाय्यक संचालक डॉक्टर संजय रणवीर आणि सांगली जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडील प्रशासकीय अधिकारी दीपक वरक यांनी कोल्हापुरातील शल्य चिकित्सक कार्यालयाला भेट देत रजिस्टरची तपासणी सुरु केली आहे.
ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार,विजय देवणे यांच्याकडून सिव्हील सर्जन डॉ.नितीन वाडीकर, आर.एम.ओ.डॉ.रेश्मा पाटील यांच्यासमोर सापडलेल्या रजिस्टरची तपासणी सुरू आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.