इचलकरंजीत दोन दिवस भव्य 'व्होकल फॉर लोकल' महोत्सव

<p>इचलकरंजीत दोन दिवस भव्य 'व्होकल फॉर लोकल' महोत्सव</p>

इचलकरंजी - शहरातील अग्रसेन भवनमध्ये येत्या १७ आणि १८ डिसेंबरला व्होकल फॉर लोकलला प्रोत्साहन देण्यासाठी इंडिया वैश्य फेडरेशन आणि द पिंक वेंनीटी यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

महिलांना आत्मनिर्भर बनवणे, स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि 'व्होकल फॉर लोकल' या संकल्पनेला बळ देणे, हा या उपक्रमांचा मुख्य उद्देश आहे. याद्वारे घरातूनच विविध व्यवसाय, हस्तकला, खाद्यपदार्थ निर्मिती तसेच इतर उपक्रम राबवणाऱ्या महिलांना एक सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अशा महिलांची कला, कौशल्ये आणि उत्पादने समाजापर्यंत पोहोचावीत, त्यांना आर्थिक स्वावलंबन मिळावे आणि आत्मविश्वास वाढावा, यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे, इंडिया वैश्य फेडरेशनच्या इचलकरंजी शहर अध्यक्षा रितु गोयंका यांनी सांगितले.

यावेळी इंडिया वैश्य फेडरेशनच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा श्वेता विकास जैन, श्वेता बगडिया, दिव्या अग्रवाल, ममता अग्रवाल उपस्थित होत्या.