कोलकात्यातील गोंधळा प्रकरणी आयोजकाला १४ दिवसांची पोलीस कोठडी
कोलकाता – काल कोलकत्यातील लिओनेल मेस्सीच्या फुटबॉल कॉन्सर्टमध्ये मोठा राडा झाला होता. या प्रकरणी प्रमुख आयोजक शताद्रू दत्त यांना सार्वजनिक व्यवस्थेचे उल्लंघन केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. यावर आज न्यायालयाने मुख्य आयोजकाला १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
काल फुटबॉलचा एक मोठा कार्यक्रम कोलकत्यामध्ये आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमाला मेस्सीने उपस्थिती लावली परंतु कडेकोट बंदोबस्तातील उपस्थितीमुळे कार्यक्रम हिंसेत बदलला. अनेक प्रेक्षक, ज्यांनी दूरच्या राज्यांतून प्रवास केला होता आणि तिकीटांसाठी मोठी किंमत मोजली होती, त्यांना फुटबॉल स्टारची एक झलकही पाहता आली नाही. यामुळे जमावात प्रचंड नाराजी पसरली. संतप्त प्रेक्षकांनी खुर्च्या, बॅरिकेड्स आणि रेलिंग्जचे नुकसान केले. या घटनेनंतर एफआयआर नोंदवण्यात आला आणि गर्दी व्यवस्थापन व सुरक्षा नियोजनातील त्रुटींचा अहवाल देत पोलिसांनी मुख्य आयोजकाला तात्काळ ताब्यात घेतले.