बिहारमधील गँगस्टरच्या खून प्रकरणातील संशयितांना शियेत एलसीबीने ठोकल्या बेड्या...
कोल्हापूर - बिहार मधील कुख्यात गँगस्टर प्रेम यादव याचा छापरा जिल्ह्यात १८ नोव्हेंबर रोजी खून करण्यात आला होता. यातील संशयित आरोपी रोहित सिंग आणि कुणाल मांझी हे खून केल्यापासून पसार होते. दरम्यान यादव खून प्रकरणातील हे दोघे संशयित आरोपी कोल्हापूर परिसरात असल्याची माहिती बिहार पोलिसांना मिळाली होती. याबाबतची माहिती त्यांनी कोल्हापूर पोलिसांनी दिली. त्यानुसार आज स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिये येथील रामनगर परिसरात सापळा रचून रोहित सिंग आणि कुणाला मांझी या दोघांना अटक केली आहे.