कसबा बावड्यात स्व. यशवंतराव भाऊराव पाटील स्मृती चषक राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ...
कोल्हापूर - डॉ. डी वाय पाटील कला, क्रीडा, शैक्षणिक आणि सांस्कृतिक ट्रस्टच्यावतीने कसबा बावडा येथील पॅव्हेलियन मैदानावर स्वर्गीय यशवंतराव भाऊराव पाटील स्मृती चषक राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आज माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेत २८ संघ सहभागी झाले आहेत. यावेळी ऋतुराज पाटील यांनी टेनिस बॉलवर फटकेबाजी करत क्रिकेटचा आनंद घेतला.
या प्रसंगी जयदीप जामदार, माजी नगरसेवक सुभाष बुचडे, अजित पोवार, रियाज सुभेदार, विनायक कारंडे, श्री राम सोसायटीचे चेअरमन संतोष पाटील, तानाजी लांडगे यांच्यासह श्रीराम सोसायटीचे आजी - माजी संचालक, खेळाडू उपस्थित होते.