उद्यापासून आचारसंहिता लागू होणार..?

<p>उद्यापासून आचारसंहिता लागू होणार..?</p>

मुंबई -  येत्या २१ डिसेंबर रोजी नगरपालिका आणि नगरपंचायतींचा निकाल लागणार आहे. त्यानंतर राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकीचे वारे वाहू लागणार आहे. त्या अनुषंगाने उद्या मुंबई महापालिकेसह 29 महापालिकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

जानेवारी महिन्यातील दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्याच्या दरम्यान मतदान होण्याची शक्यता आहे. एक महिन्याच्या आत महापालिका निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.