आता जिल्हा बॅंकांचे चेअरमनपद मुख्यमंत्र्यांनी स्वत:कडे ठेवावे...

बाजार समित्यांच्या ‘या’ कायद्यावरून राजू शेट्टी संतापले

<p>आता जिल्हा बॅंकांचे चेअरमनपद मुख्यमंत्र्यांनी स्वत:कडे ठेवावे...</p>

कोल्हापूर – सध्या सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात राज्यातील बाजार समित्यांच्या सभापतीपदी पणनमंत्री यांना नेमण्याचा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, तसा कायदाही पारित करण्यात आला आहे. त्यामुळे समितीचा सर्व कारभार मंत्र्यांचा हाती जाणार असल्याने ही लोकशाहीची हत्या होणार आहे, त्यामुळे माजी खासदार राजू शेट्टी चांगलेच संतापले आहेत.
यावेळी त्यांनी फेसबुक  पोस्ट करून “आता पुणे ,कोल्हापूर , मुंबई , सांगली , रायगड , सातारा या जिल्हा बँकांचे चेअरमनपद मुख्यमंत्र्यांनी स्वत:कडे ठेवावे ,एकनाथ शिंदे यांना व्हाईस चेअरमन करावे, अजितदादा यांना मुख्य कार्यकारी अधिकारी करून  अमित शहा यांना राज्य सहकारी बॅंकेचे अध्यक्ष करण्याचा ऐतिहासिक निर्णय घ्यावा” असा टोला लगावत टीका केली आहे.