जुना बुधवार पेठेत डंपरची धडक; महिला ठार

<p>जुना बुधवार पेठेत डंपरची धडक; महिला ठार</p>

कोल्हापूर -  जुना बुधवार पेठ परिसरात आज डंपरच्या धडकेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे. अपघात नेमका कसा झाला याची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून मृत महिलेची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. डंपर चालकाला ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे काही काळ परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली होती.