अडीच हजार रुपये पेन्शनसाठी दिव्यांगांचे जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन
 

आमदार–खासदार निधीच्या योग्य विनियोगाची मागणी

<p>अडीच हजार रुपये पेन्शनसाठी दिव्यांगांचे जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन<br />
 </p>

कोल्हापूर : आमदार खासदार निधीचा विनियोग योग्य पद्धतीनं करण्यात यावा तसंच दिव्यांगांना सन्मानजनक अडीच हजार रुपये मासिक पेन्शन देण्यात यावी, या मागण्यांसाठी प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आंदोलन करण्यात आले.

आमदार बच्चू कडू यांच्या सूचनेनुसार राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर दिव्यांग बांधवांच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापुरात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी दिव्यांग बांधवांनी शासन व प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले.

आंदोलनादरम्यान दिव्यांग बांधवांचे निवेदन स्वीकारण्यासाठी कोणताही प्रशासकीय अधिकारी बाहेर न आल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात दिव्यांगांसाठी रॅम्पची सुविधा नसल्यामुळे निवेदन सादर करताना अडचणी येत असल्याचे आंदोलकांनी निदर्शनास आणून दिले. या पार्श्वभूमीवर आंदोलकांनी शासन आणि प्रशासनाच्या भूमिकेविरोधात संतप्त भावना व्यक्त केल्या.

या आंदोलनात देवदत्त माने, समाधान हेगडकर, जयश्री शिंदे, रावसाहेब मिठारी, जयसिंग खोत, प्रदीप आयगुळे, रामचंद्र वडेर, साबेरा मुजावर, सुरेश ढेरे, तानाजी देसाई, उमेश चटके यांच्यासह मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव सहभागी झाले होते.