कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत विजयश्री खेचून आणू – जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील
शरदचंद्र पवार यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा
कोल्हापूर - राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापूर शहरातील मिरजकर तिकटी येथील अंध मुलांच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना अन्नदान करून मानवतेचा संदेश देत वाढदिवस साजरा केला. यावेळी विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी प्रार्थनेद्वारे शरद पवार यांना दीर्घायुष्य लाभो, अशा शुभेच्छा दिल्या.
यानंतर पक्ष कार्यालयात जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील व शहराध्यक्ष आर. के. पोवार यांच्या प्रमुख उपस्थितीत केक कापून वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पवार यांना दीर्घायुष्य लाभो, अशा सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी कार्यकर्त्यांना संदेश देताना सांगितले की, “या वाढदिवसाच्या शुभ मुहूर्तावर येणाऱ्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत विजयश्री खेचून आणण्यासाठी सर्वांनी एकजुटीने, झोकून देऊन कामाला लागावे.”
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सरचिटणीस सुनील देसाई यांनी केले, तर आभार प्रदर्शन निरंजन कदम यांनी केले.
यावेळी बाजीराव खाडे, पद्मजा तिवले, अनिल घाटगे, मकरंद जोंधळे, गणेश जाधव, गणेश नलावडे, सुरेश कुरणे, महादेव पाटील, रियाज कागदी, सोहेल फिरोज, सरगुर बागवान, लहू शिंदे, फिरोज उस्ताद, अरुणा पाटील, छाया नलवडे, नागेश शिंदे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.