महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने पाणीपट्टी दरात केलेली वाढ उद्योगांवर अन्याय करणारी : आ. सतेज पाटील

<p>महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने पाणीपट्टी दरात केलेली वाढ उद्योगांवर अन्याय करणारी : आ. सतेज पाटील</p>

नागपूर - आ. सतेज पाटील यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने पाणीपट्टी दरात केलेल्या वाढीचा प्रश्न विधिमंडळ अधिवेशनात उपस्थित केला.

राज्यात जलसंपदा विभागाकडून पाणीपट्टीत होत असलेली वाढ आणि विजेचा वाढलेला खर्च यामुळे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने पाणीपट्टीत वाढ केली असून पाणीपट्टीचा सुधारित दर दिनांक १ सप्टेंबर, २०२५ पासून लागू करण्यात आला आहे. मात्र महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने उद्योगांना विश्वासात न घेता तीन ते चार पटींनी अचानक वाढविलेली पाणीपट्टी ही अवास्तव असून उद्योगांवर अन्यायकारक करणारी आहे. या दरवाढीचा विपरीत परिणाम उद्योगांवर होणार असल्याकडे आमदार सतेज पाटील यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.

शासनाने या प्रकरणी चौकशी करुन अवास्तव पाणीपट्टीचे दर कमी करण्याबाबत कोणती कार्यवाही केली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यावर उत्तर देताना उद्योगमंत्री उदय सावंत यांनी, योजनेवरील एकूण खर्च आणि प्रत्यक्षात जमा होणारा महसूल यामधील तफावत वाढत असल्याचे सांगितले. तथापि, महामंडळाने फक्त पाणीपट्टी, स्वामित्व धन आणि वीज दरवाढ यातील वर्षनिहाय फरक विचारात घेऊन पाणीपट्टी वाढ केली असून ही अवास्तव नसल्याचा दावा मंत्री उदय सामंत यांनी केला आहे.