टेंबलाईवाडी मधील प्रगती हौसिंग सोसायटी आणि त्र्यंबोली कॉलनी मधील विकास कामांचा शुभारंभ
कोल्हापूर - टेंबलाईवाडी मधील प्रगती हौसिंग सोसायटी येथे राज्यसभा खासदार इमरान प्रतापगढी यांच्या निधीतून पदपथ आणि संरक्षक भिंत बांधण्यासाठी दहा लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामाचा शुभारंभ माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
अनेक दिवसांपासूनची मागणी पूर्ण झाल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले. हे काम चांगल्या दर्जाचे करण्यात येईल, असे आश्वासन माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी दिले. यावेळी प्रवीण केसरकर, शोभा कवाळे, अशोक मुसळे, प्रगती हौसिंग सोसायटीचे चेअरमन फिरोज शेख, माजी चेअरमन जयवंत माने, सचिन कंदले, गोविंद गिलबिले, राजेंद्र पाटील, सुभाष पाटील, अशोक चौगुले, राहुल भोसले, सचिन काटकर, महेश सोनुले, सचिन शेंडे आदि उपस्थित होते.
यानंतर त्र्यंबोली कॉलनी येथे स्वखर्चातून करण्यात येणाऱ्या काँक्रटी वॉकिंग ट्रक आणि चेनलिंग कंपाउंड या कामाचा शुभारंभ माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी स्थानिकांनी उपस्थिती केलेल्या समस्यांच्या अनुषंगाने लवकरच संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन माजी आमदार पाटील यांनी दिले. या प्रसंगी प्रवीण केसरकर, शोभा कवाळे, अमित कवाळे, अमर पाटील, अजित माने, संजय नायकुडे, नवीन क्षीरसागर, योगेश जाधव, एम वाय पाटील, बापू सोनुले, राजेंद्र पाटील, अनिल शिंदे, सुनील धुमाळ, शैलेश वराडकर, राजू चव्हाण, प्रदीप नलावडे, इम्तियाज नायकवडे, जयवंत आयरेकर यांच्यासह भागातील ज्येष्ठ नागरिक, महिला उपस्थित होत्या.