क्रीडा संकुलातील शुटींग रेंजचे खासगीकरण केल्यास न्यायालयात जावू :  युवा सेनेचा इशारा

<p>क्रीडा संकुलातील शुटींग रेंजचे खासगीकरण केल्यास न्यायालयात जावू :  युवा सेनेचा इशारा</p>

कोल्हापूर – शहरातील छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुलात अद्यावत शूटिंग रेंज तयार करण्यात आलीय. या रेंजमुळे कोल्हापुरात स्वप्निल कुसाळेसह अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाचे नेमबाज तयार झाले आहेत. मात्र संकुलातील शूटिंग रेंजचे खासगीकरण करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप आठवडाभरापूर्वी कोल्हापुरातील काही नेमबाजपट्टनी केला होता. त्यानंतर आज ठाकरे गटाच्या युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज या विरोधात क्रीडा संकुलाच्या आवारात आंदोलन करण्यात आले. रेंज खासगी तत्त्वावर दिल्यास गोरगरीब शहरी आणि ग्रामीण खेळाडूंना प्रशिक्षण घेणे परवडणार नाही. त्यामुळे या रेंजचे खासगी करू नये, या मागणीचे निवेदन क्रीडा अधिकारी सचिन चव्हाण यांना देण्यात आले आहे. रेंजचे खासगीकरण केल्यास प्रसंगी न्यायालयात जावू, असा इशाराही देण्यात आला.

यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख मंजित माने, कृष्णा जाधव, बंडा लोंढे, सुमित मेलवंकी, ओमकार मंडलिक, अक्षय घाडगे, तृप्ती विभूते, सानिका दामूगडे, रमेश वरुटे, आदित्य हुलजी, इंजिमाम मुल्ला आदि उपस्थित होते.