कुस्तीपटू विनेश फोगाटचं ऑलिम्पिकमध्ये पुरागमन...
नवी दिल्ली – काही दिवसांपूर्वी कुस्तीपटू विनेश फोगाट हिने निवृत्तीची घोषणा केली होती. त्यानंतर तिने आज ट्वीट करत ऑलिम्पिकमध्ये पुरागमन करणार असल्याचे म्हटले आहे.
LA 2028 ऑलिम्पिक हेच आता तिचे नवे लक्ष्य असल्याचे तिने म्हटले आहे. ती लवकरच कठोर प्रशिक्षणाला सुरुवात करणार आहे.
तिने म्हटले आहे की, “मन तुटलं आहे, अनेक त्याग केले आहेत, जे जगाने पाहिलेही नाहीत. शिस्त, दिनचर्या आणि संघर्ष अंगी भिनलेले आहेत. कितीही दूर गेले तरी माझा एक भाग नेहमी मॅटवरच असतो. कुस्तीबद्दलची आवड कधीच कमी झाली नाही. कुस्ती हा केवळ खेळ नाही, तो माझा श्वास आहे.”