कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये आयोजित महामध्यस्थी मोहिमेचा लाभ घेण्याचे आवाहन
कोल्हापूर - मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच राज्य विधी सेवा प्राधिकरण आणि उच्च न्यायालयाच्या मध्यस्थी केंद्रामार्फत ८ डिसेंबर ते २४ डिसेंबर दरम्यान महामध्यस्थी मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. महामध्यस्थी मोहिमेत यापूर्वी सर्किट बेंचमध्ये दाखल असलेले वैवाहिक वाद, अपघात दावे, घरगुती हिंसाचार, व्यावसायिक वाद, तडजोडीयुक्त फौजदारी प्रकरणे, ग्राहक विवादाची प्रकरणं, वाटणीचे वाद, भाडेकरूंचे वाद, भूसंपादनाबद्दलच्या प्रकरणांवर आपसातील समन्वय आणि मध्यस्थीने मार्ग काढले जाणार आहे. याबाबत वकील, पक्षकार, लोकसेवकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये संपर्क साधावा, असे आवाहन सर्किट बेंचमधील विधी सेवा प्राधिकरण विभागाने केले आहे.