इंडिगोच्या चार वरिष्ठ अधिकाऱ्यांना मोठा दणका... 

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाची कारवाई  

<p>इंडिगोच्या चार वरिष्ठ अधिकाऱ्यांना मोठा दणका... </p>

नवी दिल्ली – इंडिगो एअरलाईनच्या सावळा गोंधळामुळे नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने मोठी कारवाई केली आहे. महासंचालनालयाने चार फ्लाइट ऑपरेशन्स इनस्पेक्टर्सवर निलंबनाचा बडगा उगारला आहे. 
निलंबित करण्यात आलेले अधिकारी हे एफओआय (FOIs) म्हणून ओळखले जातात, आणि ते डीजीसीएचे वरिष्ठ सदस्य आहेत. या अधिकार्‍यांकडे नियमन करणे, सुरक्षा देखरेख यासंबंधी जबाबदारी असते. तसेच विमान कंपनीच्याकामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी त्यांची नियमितपणे नेमणूक केली जाते. या अधिकाऱ्यांमध्ये कन्सल्टंट ऋष राज चॅटर्जी, एसएफओ सीमा झमनानी, कन्सल्टंट अनिल कुमार पोखरियाल आणि कंसल्टंट प्रियम कौशिक यांचा समावेश आहे.