कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात मोठी खळबळ... बॉम्बने उडवण्याची  धमकी

 

<p>कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात मोठी खळबळ... बॉम्बने उडवण्याची  धमकी</p>

<p> </p>

कोल्हापूर – शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.  त्यामुळे संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली असून, तातडीने शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.
आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत मेल आयडीवर एका अज्ञात व्यक्तीने धमकीचा ई-मेल पाठवला आहे. या मेलमध्ये कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात लावलेले ५ आरडीएक्स बॉम्ब लवकरच फुटणार  असल्याचे म्हटले आहे. या धमकीची माहिती मिळताच जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना संपर्क साधून आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.