राज्यातील शिक्षकांना मोठा दिलासा...
नागपूर – सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार राज्यातील सर्व शिक्षकांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य केले आहे. त्यामुळे सर्व शिक्षकांना टीईटी परीक्षा देणे गरजेचे आहे. आता या शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी ३१ ऑगस्ट २०२६ ची मुदत वाढ देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार ही मुदत देण्यात आली आहे. या निर्णयाविरुद्ध फेरविचार याचिका दाखल करता येणार नाही, असा अभिप्राय विधि आणि न्याय विभागाने म्हटले आहे तर पुन्हा न्यायालयात दाद मागता येणार नाही असं शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत स्पष्ट केले आहे.