काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने ९० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास...

<p>काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने ९० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास...</p>

लातूर - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांचे आज निधन झाले आहे. ९० व्या वर्षी लातूरच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
 शिवराज पाटील-चाकूरकर हे तब्बल सात वेळा लोकसभेत निवडून आले होते. 35 वर्ष पराभूत न होणाऱ्या पाटील यांच्यासाठी 2004 ची निवडणूक ही कलाटणी देणारी ठरली होती. 30 हजार मतांनी त्यांना लातूर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या रुपाताई निलंगेकर पाटील यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. 
पराभूत होऊनही ते माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये गृहमंत्री झाले होते. या पराभवाने त्यांना पंतप्रधानपद मिळू शकले नसल्याचे सांगितले जाते.