साखर उद्योगातील तज्ञ व्यक्ती हरपली...सर्व स्तरातून हळहळ
कोल्हापूर - साखर उद्योगातील ज्येष्ठ तज्ञ पी.जी. मेढे यांचे काल मध्यरात्री निधन झाले आहे. त्यामुळे साखर उद्योगातील एक जाणकार आणि अभ्यासक व्यक्ती हरपल्याची हळहळ सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.
मेढे हे साखर उद्योगाच्या धोरणांवर, समस्यांवर आणि विकासावर सातत्याने भाष्य करत होते. साखर उद्योगाची माहिती, सरकारी धोरणांचे परिणाम आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडीवर ते सर्वांना मार्गदर्शन करत होते. कुडित्रे येथील कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना तसेच कसबा बावडा येथील राजाराम साखर कारखान्यावर त्यांनी काही काळ कार्यकारी संचालक म्हणून काम केले होते.