नेहरूनगर, संभाजीनगरमधील विकास कामांचा माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते शुभारंभ...
कोल्हापूर - विधानपरिषदेमधील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे नेहरूनगर मधील ओपन स्पेसच्या संरक्षक भिंतीसाठी खासदार इम्रान प्रतापगढी यांच्या फंडातून दहा लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते, माजी उपमहापौर भूपाल शेटे, माजी नगरसेवक हरिदास सोनवणे, फिरोज सौदागर, प्रसन्न वैद्य यांच्या प्रमुख उपस्थितीत या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
कळंबा फिल्टर हाऊस परिसरातील म्हाडा कॉलनीतील ओपन स्पेससाठी सुध्दा खासार इम्रान प्रतापगढी यांनी दहा लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या कामाचा माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते आणि सामाजिक कार्यकर्ते दुर्वास कदम यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला.
माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या २०२४-२५ च्या आमदार निधीतून संभाजीनगर मधील ताराराणी कॉलनीत ११ लाख ६६ हजार रुपयांच्या विकास कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण उपस्थित होते. यावेळी माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी, नागरिकांना आवश्यक सेवासुविधा मिळाव्यात म्हणून जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत असून विकास कामांमध्ये कोणतीही कसूर ठेवली जाणार नसल्याचे सांगितले आहे.
आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रयत्नामुळे कोल्हापुरात मोठ्या प्रमाणावर विकास कामे होत असून अनेक भागांचा कायापालट झाला असल्याचे माजी उपमहापौर भूपाल शेटे यांनी सांगितले.
या विकास कामांच्या शुभारंभावेळी अशोक माळी, समीर देसाई, मंदार यादव, अनिरुद्ध भुर्के, शहाजी खोपडे, मदन कोथळकर, अनिल शिंदे, रवी गावडे, रवी आवळे, राऊत महाराज, किशोर यादव, संदीप सरनाईक, युवराज पाटील, उमेश पाडळकर, रोहित गाडीवड्डर, अभिजित चरापले यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.