अथर्व दौलत साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांना दिलासा
१५ नोव्हेंबर २०२५ अखेरचे ऊस बिल खात्यात जमा
चंदगड - अथर्व दौलत साखर कारखान्याने ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत १५ नोव्हेंबर २०२५ अखेर पुरवठा झालेल्या ऊसाचे बिल आज प्रतिटन ३,४०० रुपये या दराने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले आहे.
चालू हंगाम सुरळीत सुरू असून शेतकऱ्यांना वेळेवर आणि योग्य दराने पेमेंट करणे ही कारखान्याची प्राथमिक जबाबदारी आहे. ३,४०० रुपये प्रतिटन दरामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक व्यवहारांना मोठा आधार मिळेल, असे चेअरमन मानसिंग खोराटे यांनी सांगितले.
कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मराठे यांनी, अथर्व दौलत साखर कारखाना “पारदर्शकता आणि वेळेवर बिले” या तत्त्वांवर काम करतो. ऊस बिले तात्काळ जमा करण्याच्या धोरणामुळे शेतकऱ्यांचा कारखान्यावरचा विश्वास अधिक घट्ट झाला आहे. असे सांगितले.
या कार्यक्रमाला मुख्य शेती अधिकारी युवराज पाटील, जनसंपर्क अधिकारी दयानंद देवान, तसेच लेबर ऑफिसर अश्रू लाड उपस्थित होते.