कसबा बावड्यातील ड्रेनेज लाईन कामाचा माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते शुभारंभ
कोल्हापूर - विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या फंडातून कोल्हापूर महापालिका क्षेत्रातील शुगर मिल परिसरातील शाहू नगरीत ड्रेनेज लाईनची कामे करण्यात येणार आहे. आज माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी स्थानिक नागरिकांच्यावतीने पुष्पगुच्छ देवून माजी आमदार ऋतुराज पाटील यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी माजी नगरसेवक मोहन सालपे, डॉ. संदीप नेजदार, सुभाष बुचडे, उद्योजक डी. डी. पाटील, श्रीराम सोसायटीचे सभापती संतोष पाटील, उपसभापती अनंत पाटील, अजित पवार, सर्व संचालक आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.