इंडिगो प्रवाशांना देणार महागडे ट्रॅव्हल व्हाउचर...

<p>इंडिगो प्रवाशांना देणार महागडे ट्रॅव्हल व्हाउचर...</p>

नवी दिल्ली – सध्या इंडिगो एअरलाईन्स प्रवाशांना सेवा देण्यावरून चांगलेच चर्चेत आहे. अचानक उड्डाण रद्द करण्यावरून इंडिगोची प्रतिमा  मलीन झाली आहे, ही प्रतिमा सुधाण्यासाठी इंडिगोने प्रवाशांसाठी महागडे ट्रॅव्हल व्हाउचर देण्याची घोषणा केली आहे.

3, 4 आणि 5 डिसेंबर रोजी ज्यांच्या फ्लाइट रद्द झाल्यात, अशा प्रत्येक प्रवाशाला इंडिगोकडून 10,000 रुपयांचे ट्रॅव्हल व्हाउचर देण्यात येणार आहे. हे व्हाउचर पुढील एक वर्षभर कोणत्याही इंडिगो फ्लाइट बुकिंगमध्ये वापरता येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना भरपाई मिळणार आहे.