राज्याचं अर्थकारण दिशाहीन झालंय : आ. सतेज पाटील

<p>राज्याचं अर्थकारण दिशाहीन झालंय : आ. सतेज पाटील</p>

नागपूर - अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदतीचे पॅकेज जाहीर झाले पण ते शेतकऱ्यांपर्यंत पोहचलेच नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे राज्याचं हे अर्थकारण दिशाहीन झालंय, अशी टीका आ.सतेज पाटील यांनी केली आहे. विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात ते बोलते होते.
सतेज पाटील म्हणाले, 'मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये शेतकऱ्यांसाठी म्हणून निधी गोळा केला असेल तर तो त्यांच्यासाठीच खर्च झाला पाहिजे. नंतर तांत्रिक कारणासाठी निधी देता येत नाही असं बोलणे संयुक्तिक नाही. हा निधी खर्च करता येतो. मात्र सरकारची ती भूमिका दिसत नाही. अजून पॅकेज पोहोचलं नाही. घोषणांची अतिवृष्टी झाली पण शेतकऱ्यांना पॅकेज मिळालेले नाही.'