‘मला गुन्हा कबूल नाही’ : राज ठाकरे
ठाणे – उत्तर भारतीयांना मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केल्या प्रकरणी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ठाणे न्यायालयात बोलवण्यात आलं होतं. यावेळी न्यायाधीशांनी राज ठाकरेंना गुन्हा कबूल आहे का ? अशी विचारणा केली यावर त्यांनी मला गुन्हा कबूल नसल्याचे म्हटले आहे. या सुनावणीस संपूर्ण सहकार्य करू, अशी ग्वाही त्यांनी दिलीय.
2008 साली रेल्वे भरतीदरम्यान कल्याण स्थानकावर उत्तर भारतीय उमेदवारांना मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण करत रेल्वेचे मोठे नुकसान केलं होतं. या प्रकरणी राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. यावर आज सुनावणी पार पडली.