धक्कादायक..! : ‘या’ जिल्ह्यातील 18 मराठी शाळा पडल्या बंद...
शिक्षण मंत्र्यांची विधानसभेत कबुली
नागपूर – सध्या राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात मराठी शाळांबाबत धक्कदायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे मराठी शाळा नाहीशा होतायत का..? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
आमदार अबू आझमी यांनी, मराठी शाळा बंद पडत असल्याचा प्रश्न विधानसभेत उपस्थित केला. यावेळी ठाणे महानगर पालिका क्षेत्रात गेल्या सात वर्षात 18 प्राथमिक मराठी शाळा बंद झाल्याची माहिती सरकारने दिली आहे. इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्याकडे पालकांचा कल वाढल्याने मराठी शाळा बंद पडत असल्याची कबुली शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे.