अखेर नाशिकमध्ये झाडं तोडली...पर्यावरण प्रेमी आक्रमक 

<p>अखेर नाशिकमध्ये झाडं तोडली...पर्यावरण प्रेमी आक्रमक </p>

नाशिक – आगामी कुंभमेळ्यासाठी नाशिकमधील तपोवनातील झाडं मोठ्या प्रमाणात तोडली जाणार होती यासाठी पर्यावरण प्रेमींसह अनेक नेत्यांनी जोरदार विरोध केला होता. त्यासाठी नाशिककरांनी आंदोलनाचे हत्यारही उपसले होते. तरीही नाशिक महापालिकेने एसटीपी प्लॅन्टचे कारण सांगत तपोवन जवळील तीनशे झाडांची कत्तल केली आहे. या कत्तलीमुळे पर्यावरण प्रेमी चांगलेच आक्रमक झाले आहेत.