कापूस, संत्री, कांदयाचं वाटोळं झालं...: आ. भास्कर जाधव विधानभवनात संतापले
नागपूर – राज्यातील शेतकऱ्यांची अतिवृष्टीमुळे बिकट अवस्था झाली आहे यावर मिळणारे पॅकेज हे फसवं आहे असं म्हणत ठाकरे गटाचे आ. भास्कर जाधव आज विधानभवनात चांगलेच संतापले.
विधानभवनामध्ये अतिवृष्टीवर चर्चा करता मंत्र्यांची उपस्थिती दिसून येत नसल्याने सत्ताधारी भाजप आमदारांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली. ''एनडीआरएफचे निकष तुम्ही वाढवले आहेत का? कापूस, संत्री, कांदा असेल यांचं वाटोळं झालं आहे. कोकणामध्येही मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आहे, असे म्हणत भास्कर जाधव यांनी महायुती सरकारवर सडकून प्रहार केला. 75000 कोटींच्या पुरवण्यात मांडल्या गेल्या, याचा अर्थ तुमचे बजेट पुरतं कोलमंडलं आहे. शेतकऱ्यांसाठी काय मदत करणार आहात?" अशी विचारणा त्यांनी केली. राज्याची आर्थिक स्थित बिघडली असल्याचे पुन्हा सिद्ध होत असल्याचे ते म्हणाले.