विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका - मदतनीसांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

<p>विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका - मदतनीसांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा</p>

कोल्हापूर -  अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या अनेक मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहेत. या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आज महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चासाठी जिल्हयातून मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका आणि मदतनीस महावीर गार्डन येथे एकवटले होते.

घोषणाबाजी करत हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन धडकला. अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा, वेतनवाढीची अंमलबजावणी करावी, रिक्त पदे भरावीत आदि मागण्या यावेळी करण्यात आल्या.

 निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मोर्चात जिल्हाध्यक्ष सतीशचंद्र कांबळे, शुभांगी पाटील, अकिब पठाण, वर्षा लव्हटे, रेखा पाटील, अर्चना कांबळे, अक्काताई पाटील, हेमा जाधव, यांच्यासह अंगणवाडी सेविका आणि मदतनीस सहभागी झाल्या होत्या.